esakal | नारायण राणे दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नाव निश्चित?
sakal

बोलून बातमी शोधा

नारायण राणेंना दिल्लीवरुन आमंत्रण

नारायण राणेंना दिल्लीवरुन आमंत्रण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घटिका आता अगदी जवळ आल्याची चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. साधारणतः पुढील दोन दिवसात निश्चित मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले जातेय. महाराष्ट्रातून नारायण राणे यांचं नाव आघाडीवर आहे. खासदार नारायण राणे यांना दिल्लीत तातडीने बोलावण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अचानक दिल्लवारीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राणेंचे नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. नारायण राणे आज राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१९ मध्ये घवघवीत बहुमत मिळवून सलग दुसऱ्या वेळेस केंद्रातील सत्ता मिळविली. त्यानंतर होणारा हा पहिलाच प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार आहे. सत्तेत आल्यानंतर दोन वर्षानंतर हा बदल होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगली कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार आणि फेरबदलाबाबत मॅरेथॉन बैठक मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यात सुरु आहेत. संभाव्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि प्रीतम मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा: Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...

मोदी यांच्या विस्तारित टीममध्ये साधारणतः 20 ते 21 नव्या नावांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. अर्थात विस्तार किंवा फेरबदल कधी करायचा हे पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांनाच माहिती असल्याने त्याबाबत चर्चा करण्याशिवाय राजकीय नेते व माध्यमांच्या हाती दुसरे काही नाही. राज्यातील वेगळ्याच भाजप नेत्यांचे नाव एनवेळी निश्चित करून मोदी आपले नेहमीचे धक्कातंत्रही वापरू शकतात.

हेही वाचा: चर्चा ‘टीम मोदी’च्या विस्ताराची; यांची वर्णी लागण्याचा अंदाज

पुढच्यावर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक भाजपासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण दिल्लीतल्या सत्तेचा मार्ग सर्वाधिक खासदार असलेल्या उत्तर प्रदेशातून जातो. उत्तर प्रदेशातून ८० खासदार येतात. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सत्ता कायम राखण्याचाच भाजपाचा प्रयत्न असेल. हीच सर्व समीकरण लक्षात घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो आहे.

loading image