राज्यात मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय; दोन दिवसात मुंबई-पुण्यात बरसणार - IMD

पूर्वमध्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे बुधवार (ता.७) पर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
rain
rain sakal
Summary

पूर्वमध्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे बुधवार (ता.७) पर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

पुणे - पूर्वमध्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे बुधवार (ता.७) पर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात झालेली वाढ आणि बाष्पयुक्त हवेमुळे राज्यात पुढील काही दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्याच्या सध्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत असून, उन्हाचा चटका आणि उकाडाही वाढला आहे. मंगळवारी (ता. ६) विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, हिस्सार, गोरखपूर, मिर्झापूर, जलपैगुरी ते नागालॅण्ड पर्यंत सक्रिय आहे. उत्त अंतर्गत कर्नाटक ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोमोरिन परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. गुरुवारपासून (ता. ८) राज्यात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

पुण्यातही गुरूवारनंतर सक्रीय

गणेशविसर्जनापर्यंत शहरासह जिल्ह्यात विशेष करूण घाटमाथ्यावर पाऊस चांगलाच सक्रीय होण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश सामान्यतः ढगाळ, दुपारनंतर एक-दोन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच गुरूवार (ता.८) नंतर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com