
राज्यात गेल्या काही दिवसांपासून दूपारनंतर जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. मॉन्सून सक्रीय नसल्याने स्थानिक पातळीवर बाष्पयूक्त ढगांची निर्मिती होत. कमी वेळेत जास्त पाऊस पडत होता. परंतु आता मात्र राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे.
राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार
पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून दूपारनंतर जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. मॉन्सून सक्रीय नसल्याने स्थानिक पातळीवर बाष्पयूक्त ढगांची निर्मिती होत. कमी वेळेत जास्त पाऊस पडत होता. परंतु आता मात्र राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवाह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर आता पुन्हा सक्रीय झाल्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनुपम काश्यपि यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, 'आता उत्तर महाराष्ट्र ते केरळच्या किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी लगत बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच रविवारी (ता. 13) एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॉन्सूनसाठी पोषक असे वातावरण तयार झाले असून राज्यात तो पुन्हा सक्रिय होणार आहे.'' पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असेल, तर उत्तर किणारपट्टीलगत पुढील चोवीस तास सोसाट्याचा वारा सुटेल असेही हवामान खात्याने सांगीतले आहे.
पुण्यात शनिवारी विश्रांती -
काही दिवसांपासून दुपारनंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाने शनिवारी काहीशी विश्रांती घेतल्याचे पहायला मिळाले. शनिवारी दिवसभरात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहर व परिसरात पुढील सहा दिवस (18 सप्टेंबर पर्यंत) मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असून घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागे दिली आहे.
Edited By - Prashant Patil
Web Title: Monsoon Increase Maharashtra State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..