

Monsoon Progress India
esakal
मॉन्सूनची बुधवारी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी प्रगती झाली नाही. सध्या हवामान अनुकूल नसल्याने मॉन्सूनची प्रगती संथपणे सुरू आहे. तीन ते चार दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रातील आणखी काही भागांसह पूर्वेकडील राज्यांमध्ये प्रवेश करू शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.