esakal | निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून वेगाने प्रवास सुरू केला आहे. सोमवारी (ता.२६) संपूर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. राज्यातील डहाणू, नाशिक, नांदेडपर्यंतचा भाग व तेलंगाणा, आंध्र प्रदेश व ओडिशातील श्रीनिकेतन, कूछ बेहर, घस्तीला, केवजरगड, नोवरंगपूर, इल्लूरू नालगोंडा या भागातून मॉन्सूनचे वारे माघारी फिरले आहे.

निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून वेगाने प्रवास सुरू केला आहे. सोमवारी (ता.२६) संपूर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. राज्यातील डहाणू, नाशिक, नांदेडपर्यंतचा भाग व तेलंगाणा, आंध्र प्रदेश व ओडिशातील श्रीनिकेतन, कूछ बेहर, घस्तीला, केवजरगड, नोवरंगपूर, इल्लूरू नालगोंडा या भागातून मॉन्सूनचे वारे माघारी फिरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान उद्यापर्यंत (ता. २८) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

यंदा हवामान विभागाने बदलेल्या हवामान नियोजनानुसार १७ सप्टेंबरला परतीच्या मॉन्सूनचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज दिला होता. मात्र, नियमित सर्वसाधारण वेळेच्या तब्बल अकरा दिवस उशिराने मॉन्सून परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वायव्य भारतातील पश्चिम राजस्थानातून २८ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. सहा ऑक्टोबर रोजी बहुतांशी वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासाला अडथळा तयार होऊन परतीचा मॉन्सून रेंगाळला होता. उद्या मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असून, त्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता आहे.

Edited By - Prashant Patil