महाराष्ट्रातून लवकरच मॉन्सून परतीला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता येत्या चोवीस तासांत कमी होणार असून, उत्तर आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात आणि दक्षिण ओडिसा यादरम्यान सरकेल.

पुणे - गुजरात आणि मध्य प्रदेशातून परतीच्या मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण  तयार होत आहे. त्यामुळे लवकरच राज्यातूनही परतीच्या मॉन्सूनचा मुक्काम हलणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता येत्या चोवीस तासांत कमी होणार असून, उत्तर आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात आणि दक्षिण ओडिसा यादरम्यान सरकेल. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला माघार घेण्यासाठी आणखी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातूनही वेगाने मॉन्सून सरकण्याची शक्‍यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला असून, राज्यातील अनेक भागांत वादळी वारे व मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 
उत्तर भारतात पावसाने उघडीप दिल्याने हवेतील ओलावा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात चढउतार सुरू आहेत. पश्‍चिम 
राजस्थानमधील चुरू येथे 40.7 अंशसेल्सिअस, तर पूर्व राजस्थानात भिलवरा येथे 17.7 अंश सेल्सिअसच्या सर्वांत कमी तापमानाची नोंद झाल्याचे हवामान 
विभागाने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon returns from Maharashtra so