Pawar Vs Pawar : रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवार संतापले; म्हणाले, लोकप्रतिनिधींनी...

ajit pawar and rohit pawar
ajit pawar and rohit pawar
Updated on

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज विरोधकांनी दिवसाच्या सुरूवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मात्र लक्ष वेधलं ते शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्या आंदोलनाने. रोहित पवार आज कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या मुद्दावर कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून आंदोलनाला बसले आहेत. त्यावर अर्थमंत्री अजित पवार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.

ajit pawar and rohit pawar
…तर १०० टक्के अजित पवारच मुख्यमंत्री होतील, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना विश्वास

रोहित पवार यांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं आहे. याचे पडसाद सभागृहात दिसत आहेत. याआधी यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले, तेव्हा तेथील पावित्र्य राखलं पाहिजे, या उद्देशाने तिथं आंदोलन किंवा उपोषण करायचं नाही, हे ठरलं आहे.

रोहित पवार यांनी तिथं आंदोलन किंवा उपोषण करू नये. तसेच आपलं म्हणणं, सभागृहात येऊन मांडावे, असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.

ajit pawar and rohit pawar
Scholarship : राज्यातील पहिली ते आठवीचे लाखो अल्पसंख्याक विद्यार्थी वंचित

रोहित पवार यांच्या आंदोलनावर अजित पवार यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले की, या संदर्भातील पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी १ जुलै २०२३ रोजी पत्र लिहून सांगितले की पाटेगाव खंडाळा (कर्जत जामखेड) येथील वसाहत औद्योगिक वसाहत जाहीर करण्याबाबत आपलं पत्र प्राप्त झालं आहे. यावर सर्व संबंधितांसोबत चर्चा करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, असंही म्हटलं.

दरम्यान आधिवेशनाला एकाच आठवडा झाला आहे. मंत्री महोदयांनी पत्र दिलं आहे. अधिवेशन संपलेलं नाही. लोक प्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर एमआयडीसीचे चेरअमन आणि मंत्री महोदयांनी पत्र दिल्यानंतर याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. अशा पद्धतीने आंदोलन करणे उचित नसल्याचं रोहित पवार यांनी उद्देशून अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Sharad Pawar visits the CJP protest
Marathi News Esakal
www.esakal.com