
मुंबई - राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संपलं. या अधिवेशनात राज्याच्या हिताचे अनेक निर्णय झाले. कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. 9 दिवसांमध्ये 6 दिवसाचे कामकाज झालं. तसेच पुढील हिवाळी अधिवेशनाची तारीखही ठरली असून ते नागपूरमध्ये घेण्याचं ठरलं आहे. (the monsoon session of Maharashtra Legislature is over What was decided in interest of the state)
या अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्त्वपूर्ण अशी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यानुसार, एकूण 10 विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच विविध विभागांच्या 25 हजार 826.72 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे घेण्यात यावं अशी शिफारस राज्यपालांना करण्यात आली.
अधिवेशनात काय झाले निर्णय?
1) भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव
2) नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
3) औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधानमंडळाचा ठराव.
4) थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.
5) राज्यात “एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.
6) सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार. एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत, पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा.
7) आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.
8)मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार तीन वर्षात काम पूर्ण करणार.
9) धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.
10) गिरणी कामगारांना 50 हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.
11) मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.
12) बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी.
13) बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर.
14) मेट्रो मार्ग 5 चा विस्तार करण्यात येणार आहे.
15) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के व कक्षेबाहेरील 50 टक्के पदभरती करणार.
16) राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार.
17) 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांची घरे मालकी हक्काने देण्यात येईल.
18) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार.
19) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार.
20) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार
21) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर
22) आश्रमशाळांसाठी 600 कोटींची तरतूद.
23) राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार.
24) कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी
25) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
26) राज्यात साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्याचा निर्णय.
27) रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी.
28) पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग.
29) स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.
30) खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प.
31) जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये 1 हजार 70 पाणी पुरवठा योजना मंजूर.
32) बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी
33) दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.