सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची होणार CBI चौकशी? हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे संकेत

सोनाली फोगाट या भाजपच्या नेत्या होत्या, त्यांचा गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला.
Sonali Phogat
Sonali Phogat
Updated on

चंदीगड : भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे संकेत हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिले. पण याचा निर्णय त्यांनी पूर्णतः फोगाट कुटुंबियांवर सोपवला आहे. (Sonali Phogat death CM Khattar assures CBI probe if family demands in writing)

मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, जर सोनाली फोगाट यांच्या कुटुंबियांनी आम्हाला लेखी स्वरुपात या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली तर आम्ही ती करु. पण शवविच्छेदन अहवलानंतरच फोगाट कुटुंबियांचा सोनाली यांच्या मृत्यूबाबतचा संशयाची स्पष्टता होईल.

Sonali Phogat
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार २९ ऑगस्टलाच होणार, परिपत्रक जारी

यासंदर्भात माझं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि पोलिसांशी बोलणं झालं आहे. सोनाली फोगाट यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूची संशयास्पद मृत्यूबाबत लेखी तक्रार दिली होती. पण याबाबत आपल्याला अधिक माहिती केवळ शवविच्छेदनानंतरच मिळेल. पण मृत्यूबाबतचे जे नमुने गोवा सकारनं तपासणीसाठी घेतले ते नमुने चंदीगडमध्येही तपासले जाणार आहेत.

Sonali Phogat
Salman Rushdie : सलमान रश्दींवरील हल्ल्याचा भारतानं नोंदवला निषेध!

सोनाली फोगाट या हरयाणाच्या हिस्सार येथील रहिवासी असून त्यांचा मंगळावारी उत्तर गोव्यातील सेंट अँथोनी हॉस्पिटल इथं मृत्यू झाला. या ठिकाणच्या प्राथमिक अहवालानुसार सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असल्याचं समोर आलं आहे. पण हा मृत्यू संशयास्पद असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com