
मान्सून यंदा पाच दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये येत्या दोन दिवसात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. तर येत्या २४ तासात अरबी समुद्रात असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सध्या कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकण किनारपट्टीपासून आत पूर्व मध्य अरबी समुद्रात आहे. तो येत्या २४ तासात उत्तरेकडे सरकेल आणि जास्त तीव्र होईल असा अंदाज आहे.