तीन ते चार दिवसांत या राज्यात मॉन्सून होणार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीसाठी वातावरण अनुकूल झाले असून सोमवारी (ता. २७) मॉन्‍सूनने अरबी समुद्र आणि गुजरातच्या बऱ्याच भागात प्रगती केली.

तीन ते चार दिवसांत या राज्यात मॉन्सून होणार दाखल

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीसाठी वातावरण अनुकूल झाले असून सोमवारी (ता. २७) मॉन्‍सूनने अरबी समुद्र आणि गुजरातच्या बऱ्याच भागात प्रगती केली. तब्बल अकरा दिवसांच्या विश्रांति नंतर मॉन्‍सून पुन्हा प्रगती करत आहे. तर पोषक हवामानामुळे मॉन्सूनची पुढील वाटचाल अशीच सुरू राहणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्‍मीरच्या काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

सध्‍या उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच या परिसरावर चक्राकार वारे सुद्धा वाहत आहेत. या प्रणालीपासून मध्य प्रदेश व लगतच्या परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिया आहे. दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा तर, राजस्थान व परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

जोरदार पावसाची शक्यता -

हवामानाची सध्य स्थिती पाहता पुढील तीन दिवस म्हणजेच येत्या गुरुवारपर्यंत (ता. ३०) पश्‍चिम राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आदी भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ ही देण्यात आला आहे.

Web Title: Monsoon Will Arrive In The State In Three To Four Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiarainWeatherMonsoon