esakal | महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू

महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू

sakal_logo
By
राजेश रामपूरकर - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकाच वाघाने दहापेक्षा अधिक जीव घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मागील आठ महिन्यात राज्यात ५५ जण मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाले आहेत. त्यात सर्वाधिक ४१ मृत्यू वाघाच्या हल्ल्यातील असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी १५ टक्के अधिक आहे.

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ होत असताना त्याचा अधिवास कमी झालेला आहे. वन विभागाने संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाघासह इतरही वन्यप्राण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, विकासकामे, रस्त्याचे रुंदीकरण आणि वाघाचा अधिवास शोधण्यासाठी होणारी भटकंती. यामुळेही वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढलेला आहे. त्यामुळेही वाढलेली वन्यजीवांची संख्या आता वन विभागासाठी डोकेदुखी ठरु लागले आहे.

गेल्या आठ महिन्यात मनुष्यावर हल्ले केलेल्या दोन ते तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेले आहेत. दोन वाघांना जेरबंद करण्यात यशही आलेले आहेत. आता गडचिरोली जिल्ह्यातील मनुष्यावर हल्ला केलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने आदेश दिलेले आहेत. त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाचे पथक प्रयत्न करीत आहेत. अद्यापही त्याला यश आलेले नसले तरी कर्मचारी दिवस-रात्र त्या वाघाचा मागोवा घेत आहे. आता पुन्हा मनुष्य हानी होऊ नये म्हणूनही प्रयत्न करीत आहेत.

गेल्यावर्षी राज्यात नऊ महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५३ जणांनी जीव गमावले होते. यंदा आठ महिन्यातच ५५ जणांचे जीव गेल्याची उघडकीस आले आहे. वाघामुळे ४१, बिबट्याने १०, जंगली डुकरांमुळे तीन आणि एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ४९ मृत्यू विदर्भात आहेत. देशात सर्वाधिक वाघाच्या हल्ल्यात मृत्यू राज्यातच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: भारत कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही कारण... - जावेद अख्तर

राज्यात गेल्या आठ महिन्यात ५५ जणांचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेले आहेत. त्यात सर्वाधिक ४१ मृत्यू वाघाच्या हल्‍यातील आहेत.

-युवराज, मुख्य वनसंरक्षक

वर्ष - मृत्यू - नुकसान भरपाई

२०२१ - ५५ - ५.२५ कोटी

२०२०- ८८ - १८.७५ कोटी

२०१९ - ३२ - ५.८५ कोटी

२०१८ - ३६ - ३.१२ कोटी

२०१७ - ५०- ४.३२ कोटी

loading image
go to top