
राज्याच्या राजकारणात कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी काल खासदार अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले आणि अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं ते म्हणाले. काल अजित पवारांनी ते वक्तव्य केलं त्यानंतर आज सकाळीच ते अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले. शरद पवारांच्या मोदी बागेतील कार्यालयात ही भेट झाली आहे.
या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण देखील सांगितलं आहे. शेतकरी मोर्चा उद्या(बुधवार) पासून सुरू होत आहे. २७ ते ३० डिसेंबर यादरम्यान हा मोर्चा पार पडणार आहे. शिवनेरीच्या पायथ्यापासून या मोर्चाला सुरूवात होणार आहे. कांदा प्रश्न, पिक वीमा, दुधाचे दर, शेतकऱ्यांना कर्जमाफी याशिवाय इतर मागण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतलं, याबाबत चर्चा झाल्याचे अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर ३० तारखेला शरद पवारांची सभा पार पडणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवार मोठे नेते आहेत. मी काय एक कार्यकर्ता आहे. त्याच्याबाबत मी काय बोलणार.अजित पवारांनी जेव्हा कान धरण्याचा आधिकार होता तेव्हा कान धरला असता तर सोपं झालं असतं असंही ते पुढे म्हणाले.
तर अजित पवारांच्या दौऱ्याबाबत आणि पाहणीबाबत ते म्हणाले की, मी त्यांचा आभारी आहे. ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. तर यासंदर्भातील पाहणी आम्ही ६ महिन्यांपुर्वीच केली आहे. त्यानंतर मांजरी उड्डाणपुल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी अजित पवारांकडे केली होती. त्यांनी ही पाहणी केली त्यामुळे माझ्या मतदार संघातील नागरीकांसाठी सोयीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले आहेत.
अजित पवार मोठे नेते आहेत. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांने मला आव्हान देणं, हा मी माझा गौरव समजेन, ते आमचे नेते होते. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांला शोभणारे नाही. त्यांच्याबाबतचा आदर कायमच मनात आहे. तो व्यक्ती म्हणून तसाच राहिलं.राजकीय भूमिका आता बददली असल्याने त्यांचं असं काही विधान असेल तर मी त्यांना भेटून हे समजून घेईन, असंही कोल्हे पुढे म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.