खासदार संभाजीराजे म्हणतात, 'आरक्षण गेलं खड्ड्यात...'

MP chhatrapati sambhajiraje gets angry about maratha reservation after student suicide in Osmanabad
MP chhatrapati sambhajiraje gets angry about maratha reservation after student suicide in Osmanabad

मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून रेंगाळत राहीला आहे. आरक्षण मात्र अद्यापही मराठ्यांच्या पदरी पडलेले नाही. हा मुद्दा मार्गी लागत नसल्याने आणि आरक्षण न मिळाल्याने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उस्मानाबादच्या एका मराठा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी 'आरक्षण गेलं खड्ड्यात..' अशा शब्दात व्यवस्थेवरील राग व्यक्त केला. 
 


उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळालीतील अक्षय शहाजी देवकर या विद्यार्थ्याला दहावीला 94 टक्के गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. मराठा असल्यामुळे त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. या घटनेबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी माहिती घेत पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करण्याची मागणी केली आहे. 
 


छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत या घटनेवर प्रश्न उपस्थित करत ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. 'योग' करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत?? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय??'
 


'व्यवस्थे'कडे बोट दाखवत छत्रपती संभाजीराजे यांनी 'मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही?' असे राज्यासमोर प्रश्नांचा पाढाच वाचला. तसेच शेतकरी आत्महत्येबाबतही छत्रपती संभाजीराजेंनी व्यवस्थेला दोषी ठरवले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com