
पारनेर : दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे. मात्र आज दुधाला योग्य भाव मिळत नाही, उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे दुधात भेसळ करणारे लोक सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करत आहेत.