
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरून सेना खासदारांचा उद्धव ठाकरेंवर दबाव!
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रपती पदाच्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. खासदार शेवाळे यांनी पत्र लिहित उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. आमदारांकडून साथ सोडल्यानंतर आता खासदारांकडूनही भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात ठाकरेंवर दबाव टाकण्यात येत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे.
(Uddhav Thackeray News)
येत्या काही दिवसात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान भाजपकडून द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली असून विरोधी पक्षनेत्यांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देशात भाजपकडे बहुमत असून त्यांना पाठिंबा देण्याची मागणी करत आता सेनेचे खासदारांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर आता दबाव आणला जात आहे.
राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित सांगितलं की, भाजप शिवसेना युती असताना बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा न देता महाराष्ट्रातील उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणूनही कामगिरी बजावली आहे. एकंदरीत त्यांची पार्श्वभूमी बघता आपण त्यांना पाठिंबा द्यावे अशी मागणी करतो. अशा आशयाचे पत्र शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
Web Title: Mp Rahul Shewale Shivsena Uddhav Thackeray Presidential Election Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..