Sambhaji Raje Meets Devendra Fadnavis | संभाजीराजे-देवेंद्र फडणवीस भेट; कोणती नवी राजकीय समीकरणं शिजणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajiraje Met Devendra Fadnavis
संभाजीराजे-देवेंद्र फडणवीस भेट; कोणती नवी राजकीय समीकरणं शिजणार?

संभाजीराजे-देवेंद्र फडणवीस भेट; कोणती नवी राजकीय समीकरणं शिजणार?

राज्यसभेची मुदत संपल्यानंतर संभाजी राजे छत्रपती लवकरच आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. यासाठी संभाजी राजेंनी १२ मे रोजी पुण्यात आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे कोणत्या पक्षात जाणार आणि काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचीही ते भेट घेणार आहेत. (Sambhajiraje Meets Devendra Fadnavis)

हेही वाचा: खासदारकीची मुदत संपतेय, ३ मे नंतर माझी दिशा वेगळी - संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ३ मे रोजीच संपला आहे. त्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल, याबद्दल संभाजीराजे पुण्यात समर्थकांची बैठक घेत आहेत. १२ मेला होणाऱ्या या बैठकीमध्ये नवा पक्ष काढायचा की नाही, याची चाचपणी केली जाणार आहे. त्याचबरोबर आज ते भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे.

हेही वाचा: ठरलं! संभाजीराजे 12 मे ला पुढील राजकीय भूमिका करणार स्पष्ट

भाजपाकडून संभाजीराजेंना खासदारकी देण्यात आली होती. त्यामुळे आता नवा पक्ष काढायचा की भाजपात प्रवेश करायचा याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याशी संभाजीराजे चर्चा करतील. तसंच त्यांना भाजपात येण्याची ऑफर आजच्या बैठकीत मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Mp Sambhaji Raje Meets Devendra Fadnavis In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top