
ठरलं! संभाजीराजे 12 मे ला पुढील राजकीय भूमिका करणार स्पष्ट
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची ३ मे ला राज्यसभेची मुदत संपली आहे. यानंतर त्यांची पुढची दिशा काय असणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संभाजीराजे छत्रपती हे १२ मे ला आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता ते कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, १२ तारखेला पुण्यातून माझी पुढची भूमिका स्पष्ट करेन असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे कोणत्या पक्षात जाणार आणि कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता ते १२ तारखेलाच कळणार आहे. (Sambhaji Raje News Updates)
हेही वाचा: कोल्हापुरात लोकराजा शाहू राजांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन!
संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेविषयी मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा सुरु आहेत. मात्र ते सध्या त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहून पक्षप्रवेशा ऐवजी 'एकला चलो रे' च्या भूमिकेत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती १२ तारखेला नेमकी कोणती भूमिका जाहीर करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दिल्लीचे राजकारण करणार की महाराष्ट्राचे राजकारण या प्रश्नावर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी ते म्हणाले, दोन्ही मला आवडतं. राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीत मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवीय. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा: मान्सूनसाठी अनुकूल वातावरण, यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार
Web Title: Sambhajiraje Chhatrapati Declared Next Political Step In 12 May In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..