esakal | पुरावर कायमस्वरूपी उपाय शोधा, संभाजीराजेंची सरकारला विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

today song series of sahyadri pratishthan launch event said sambhajiraje chhatrapati in kolhapur

पुरावर कायमस्वरूपी उपाय शोधा, संभाजीराजेंची सरकारला विनंती

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : कोल्हापूरला (Kolhapur Flood)पुराचा तडाखा बसला आहे. यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) हे थेट दिल्ली वरून पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी कोल्हापूरला आले आहेत. कोल्हापुरातल्या पुरावर कायमस्वरूपी उपाय शोधा असे त्यांनी शासनाला आवाहन केले आहे. राज्य आणि केंद्र शासनाने पावले उचलावीत अशी विनंती ही त्यांनी केली आहे.

(MP-Sambhajiraje-Chhatrapati-visit-on-kolhapur-flood-people-rain-latest-news-akb84)

संभाजी राजे म्हणाले, दरवर्षी कोल्हापूरला पुराचा तडाखा बसतो. यावरती आता शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्या . हायवे क्लिअर असणे गरजेचे आहे. (ग्रीन कॉरिडोर) जिथे जिथे पूर येतो (शिरोली फाटा, पुणे -बेंगलोर हायवे, कोल्हापूर -राधानगरी रोड, किनी टोल नाका) येथे ओवरब्रिज होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: 'पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका'

कोल्हापूर शहराची व्याप्ती वाढत आहे याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शहरांमध्ये सात पुल आहेत. यातील एक पुल सोडला तर बाकीचे सहा पुल हे पाण्याखाली जातात‌. कोल्हापूरमध्ये दरवर्षी पूर येतो. प्रशासन त्या-त्यावेळी निश्चितच उपाय योजना करते. मात्र यावर कायमस्वरूपी उपाय होणे गरजेचे आहे. रेड झोन, नदीत असणारा गाळ, तलावात असणारा गाळ याचे मायनिंग होते. त्याचे नियम पाळून तेथे प्लांटेशन होणे गरजेचे आहे. यावरती कडक कारवाई करून निर्णय होणे आता गरजेचे आहे.

loading image
go to top