'पुणे- बेंगलोर हायवे सुरू करण्याबाबत सांयकाळी निर्णय'

'पुणे- बेंगलोर हायवे  सुरू करण्याबाबत सांयकाळी निर्णय'
Updated on

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : सांगली फाटा येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय (Pune-Bangalore National Highway) महामार्गावर आलेल्या महापुराच्या पाण्याची जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे (Shailesh Balkwade) यांनी पाहणी केली. आज दुपारी पोकलँडने रस्त्याची चाचपणी केली ; मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे पोकलँड आत जाऊ शकला नाही. त्यामुळे सांयकाळी पुन्हा पोकलँडने रस्त्याची चाचपणी करुन, त्यानंतर अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे बलकवडे यांनी सांगीतले.यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ(Prasad Sankpal),पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी किरण भोसले (Kiran BHosale)व टीम या पाहणीत सहभागी होते.

सांगली फाटा येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या महापुराच्या पाणी पातळी काल रात्री पासून दिड फुटाने कमी झालेली आहे. पाणी संथ गतीने कमी होत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक आद्याप बंद असून, महामार्ग सुरू झाल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.(Pune-Bangalore-National-Highway-closed-dont-believe-the-rumors-Appeal-police-administration-akb84)

शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे ; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले. पाणी संथ गतीने कमी होत आहे. पाणी आडवे मागे सरकले असले तरी महामार्गावरील पाण्याची उंची कायम आहे.

'पुणे- बेंगलोर हायवे  सुरू करण्याबाबत सांयकाळी निर्णय'
पुणे - बंगळूर महामार्ग बंदच; राधानगरी धरण 98 टक्के भरले

पाण्याला प्रचंड वेग आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी बोटीतून रस्त्याची पाहणी केली. पाण्याला वेग प्रचंड असून, पाण्याची पातळी आणखी तीन फूटाने कमी झाल्या नंतर, पोकलँडने रस्त्याची चाचपणी केली जाईल, त्यानंतर अवजड वाहतूक सुरू होण्याची शक्यता भोसले यांनी व्यक्त केली. म्हणजेच पावसाने उघडीप दिली आणि पाण्याची पातळी कमी झाली तरच सायंकाळ नंतर महामार्गावरून अवजड वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Forest Department action
Who is Dr Sriram Saran?
Kolhapur Ring Road development project
Dr D Y Patil educational contribution
Marathi News Esakal
www.esakal.com