'मुख्यमंत्री म्हणाले, संभाजीराजे तुमच्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

मागील सरकारने रायगड संवर्धनासाठी 706 कोटी दिले. पण, गेल्या दोन वर्षांत एक टक्काही काम झाले नाही. रायगडही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. माझी अस्वस्था मी मुख्यमंत्र्यां सांगितले आहे. असे काम होणार असेल तर या जबाबदारी मधून मला मुक्त करा मी अशी मागणी केली.

मुंबई : रायगड संवर्धनाच्या कामासंदर्भात मी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व कामाबद्दलची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांत एक टक्काही काम झाले नसल्याचे सांगितल्याने मला जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी त्यांच्याकडे केली. पण, उद्धव ठाकरेंनी मला रायगडाचे संवर्धन तुम्हीच करा आणि तुमच्याशिवाय कोणीच दुसरं कोणी करू शकत नाही असे म्हटल्याचे, खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने पहिला निर्णय रायगड संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा घेतला होता. गेल्या पाच वर्षांत खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगड संवर्धनासाठी निधी देण्यात आला. पण, काम काहीच झाले नसल्याचे संभाजीराजे यांचे म्हणणे आहे. या संदर्भात त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

अमृता फडणवीसांचे पुन्हा एकदा ट्विट आणि पुन्हा 'हेच' लक्ष्य

या भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले, की मागील सरकारने रायगड संवर्धनासाठी 706 कोटी दिले. पण, गेल्या दोन वर्षांत एक टक्काही काम झाले नाही. रायगडही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. माझी अस्वस्था मी मुख्यमंत्र्यां सांगितले आहे. असे काम होणार असेल तर या जबाबदारी मधून मला मुक्त करा मी अशी मागणी केली. पण, उद्धव ठाकरेंनी मला सांगितले की याच संवर्धन तुम्हीच करा. कारण तुमच्याशिवाय दुसरं कुणी करू शकणार नाही. जे लोक भ्रष्टाचारामध्ये आहेत त्यांना पहिल्या आठवड्यात बोलून विचारणा केली जाईल. महाराजांपुढे मला कोणी मोठं नाही, म्हणून यात काही चूक व्हायला नको, असे त्यांनी सांगितले. वंशज म्हणून खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मी आधीपासून आवाज उठवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhajiraje meet CM Uddhav Thackeray over Raigad Fort