esakal | ममता विरोधी पक्षांच्या बैठकीला का उपस्थित नव्हत्या? संजय राऊतांनी दिले उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sanjay Raut

ममता विरोधी पक्षांच्या बैठकीला का उपस्थित नव्हत्या? राऊतांनी दिले उत्तर

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : पेगॅससचा वापर करून पाळत ठेवल्याच्या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी गदारोळ घातला आहे. यावरून बुधवारी विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधीही उपस्थित होते. मात्र, तृणमुल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. त्यावरच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. (mp sanjay raut commented on opposition party meeting about pegasus)

हेही वाचा: 'ममतां'नी घेतली सोनिया गांधींची भेट; 2024 च्या निवडणुकीची तयारी?

संजय राऊत म्हणाले, ममता बॅनर्जी यांचे शरद पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चांगले संबंध आहेत. ममतांचं म्हणणं आहे की, आधी सर्वांनी एकत्र यावं. त्यानंतर नेता कोण असेल हे ठरवता येईल. तृणमूल पक्षाची बैठक असल्यानं त्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, त्यांनी पावसाळी अधिवेशनावरून देखील भाजप सरकारवर निशाणा साधला. सरकारला लोकशाही आणि संसदीय प्रणालीवर विश्वास नाही. सरकारला विधेयक गोंधळात संमत करायची आहेत. पेगॅससबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः संसदेत उपस्थित राहावं. मोदी आणि शाह या चर्चेसाठी तीन तास का देऊ शकत नाहीत? असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही, असा आरोपही त्यांनी केला.

loading image
go to top