Prashant Pawar : संजय राऊत हे शिवसेनेचे विदूषक; निकालनंतर त्यांना जागा दाखवू

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना कोयता गॅंगसोबत त्यांचा संबंध जोडल्याने राष्ट्रवादीचे नेते चांगलेच चिडले आहेत.
Sanjay Raut
Sanjay RautSakal

नागपूर - खासदार संजय राऊत हे राजकारणातील विदूषक आहेत. लोकसभेची निवडणूक असल्याने मनोरंजनासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे त्यांचा वापर करीत असल्याचे प्रत्युत्तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी दिले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचे आम्ही नाक दाबू असाही इशारा राष्ट्रवादीच्यावतीने पत्रपरिषदेत देण्यात आला.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना कोयता गॅंगसोबत त्यांचा संबंध जोडल्याने राष्ट्रवादीचे नेते चांगलेच चिडले आहेत. मागच्या दाराने राज्यसभेत जाणाऱ्या राऊतांना जनतेतून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान त्यांना प्रशांत पवार यांनी दिले.

अजित पवार यांची राजकीय उंची, प्रशासन चालवण्याची हातोटी आणि संघटन बांधणी बघता राऊत यांची त्यांच्यावर टीका करण्याचीसुद्धा लायकी नाही. रोज माध्यमांसमोर काहीतरी बरळण्याचा आजार त्यांना जडला आहे. त्यांच्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. ४० आमदार आणि १३ खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. हे बघून आता उद्वव सेनेच्यावतीनेसुद्दा त्यांना कोणी प्रचाराला बोलवत नाही.

शिवसेनेत राहून ते कोणासाठी काम करतात हे आता लपून राहिलेले नाही. शरद पवार हे त्यांचा आता विदूषक म्हणून वापर करीत आहेत. बारामती आणि पुण्याचा विकासात अजित पवार यांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही.

महाविकास आघाडीचे सरकार असता राऊत हे अजित पवार यांची प्रशंसा करीत होते. तेव्हा कोयता गँगसोबत असलेला संबंध त्यांना दिसला नाही. आता निवडणूक असल्याने अजित पवार यांच्या विरोधात काही मुद्दे सापडत ते कशाशीही संबंध जोडून स्वतःकडे लक्ष वेधून घेत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल असा इशाराही प्रशांत पवार यांनी यावेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com