युतीचे जागावाटप भारत-पाक फाळणीपेक्षा भयंकर : संजय राऊत

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र एवढा मोठा आहे. या 288 जागांचे वाटप जे आहे ना ते भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीपेक्षा भयंकर आहे. जागावाटपाबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. आम्ही जो काही निर्णय घेऊन तो तुम्हाला कळवू.

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचा निर्णय अद्याप झालेला नसून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीतील जागावाटप हे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीपेक्षा भयंकर असल्याचे म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीचे घोंगडे भिजत पडले असून येत्या 26 सप्टेंबर रोजी युतीचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा 26 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होत असून, त्या दिवशी युती होणार किंवा नाही याबाबतचा निर्णय होणार आहे. भाजपकडून 105 आणि 165 असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कोण माघार घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

युतीविषयी संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्र एवढा मोठा आहे. या 288 जागांचे वाटप जे आहे ना ते भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीपेक्षा भयंकर आहे. जागावाटपाबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. आम्ही जो काही निर्णय घेऊन तो तुम्हाला कळवू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay Raut talked about Shivsena BJP alliance