पंतप्रधान म्हणून चांगलं कोण, शरद पवार की उद्धव ठाकरे? खासदार शिंदे म्हणतात... | Shrikant Shinde on Prime Minister Position | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikant Shinde on Prime Minister Position

पंतप्रधान म्हणून चांगलं कोण, शरद पवार की उद्धव ठाकरे? खासदार शिंदे म्हणतात...

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव नेहमी पंतप्रधान पदासाठी घेतलं जातं. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील शिवसेना केंद्रात जाईल, असा दावा करतात. पण, पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे की शरद पवार चांगले असतील? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारण्यात आला. (Shrikant Shinde on Prime Minister Position)

हेही वाचा: सत्ता दुरावल्यामुळेच भाजपची अस्वस्थता वाढली : श्रीकांत शिंदे

खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामा ओपन माइक कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदेंना पंतप्रधान पदाबद्दल प्रश्न विचारला. केंद्रात तुमचं सरकार आलं तर पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे की शरद पवार चांगले असतील? असा प्रश्न जलील यांनी विचारला. यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे हे चांगले पंतप्रधान असतील, असं उत्तर दिलं. (Shrikant Shinde on Uddhav Thackeray)

महाविकास आघाडीत कोणाचं काम चांगलं? -

श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीत कोणाच्या कामावर समाधानी आहेत? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? असा प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याचा गाडा हाकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काम करतात. एकनाथ शिंदेंना मंत्रीपदाची संधी उद्धव ठाकरेंमुळेच मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत, असं शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी पंतप्रधानपदाबाबतच्या वक्तव्यासोबतच इतर नेत्यांच्या प्रश्नांना देखील उत्तरं दिली. श्रीकांते शिंदेंची संसदेत ही दुसरी टर्म आहे. दोन्ही टर्ममध्ये तुम्हाला संसदेत काय फरक जाणवला? असा प्रश्न आदिती तटकरे यांनी विचारला. यावेळी शिंदे म्हणाले, ''2014 मध्ये सर्वच नवीन होतं. सुरुवातीचा काळ सर्व गोष्टी समजण्यात गेला. संसदेत खूप काही शिकण्यासारखं होतं. मोठमोठ्या नेत्यांच्या भाषणांमधून शिकता आलं.''

दरम्यान, धीरज देशमुख यांनी एक खासगी प्रश्न विचारला तेव्हा सभागृहात हशा पिकला. तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न धीरज देशमुखांनी विचारला तेव्हा शिंदे यांनी मजेशीर उत्तर दिलं. यामध्ये अनेक नावे घेता येतील, असं ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल देखील माहिती दिली. आम्ही फक्त ठाण्यात वैद्यकीय मदत कक्ष राबवत नाहीतर २४ जिल्ह्यात राबवत आहोत. यामध्ये स्वयंसेवक निःशुल्क काम करतात. हा पॅटर्न सर्वच पक्षांनी अवलंबला तर वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होऊ शकते, असंही शिंदे म्हणाले.

Web Title: Mp Shrikant Shinde Says Uddhav Thackeray Will Be The Best Prime Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top