Sat, Sept 30, 2023

गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी (Chhatrapati Shivaji Maharaj) जीव, की प्राण होते.
Udayanraje Bhosale : प्रतापगड प्राधिकरण अध्यक्षपदी खासदार उदयनराजे; रायगडावरून CM शिंदेंची मोठी घोषणा
Published on : 3 June 2023, 1:14 am
सातारा : प्रतापगडाच्या (Pratapgad) संवर्धनासाठी प्राधिकरण निर्माण करणार असून, त्याच्या अध्यक्षपदी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवराज्याभिषेक उत्सव दिनी रायगडावरून केली.
तसेच मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचे, तसेच रायगडच्या पायथ्याला ४५ एकरांत शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले.
गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी (Chhatrapati Shivaji Maharaj) जीव, की प्राण होते. महाराष्ट्रातील या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे विकास प्राधिकरण स्थापन करणार असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले.