esakal | धाकट्या बंधूंना मदत करावीच लागेल : खासदार उदयनराजे भोसले
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje-shivendra.jpg

धाकटे बंधू असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे मला काम करावेच लागेल, असे म्हणतानाच आमची स्वत:ची जत्रा असताना कुणाच्या यात्रेला कशाला जायचे, असे सांगत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होणार नसल्याचा सूचक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. योग्य वेळी लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असेही ते या वेळी म्हणाले. 

धाकट्या बंधूंना मदत करावीच लागेल : खासदार उदयनराजे भोसले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : धाकटे बंधू असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे मला काम करावेच लागेल, असे म्हणतानाच आमची स्वत:ची जत्रा असताना कुणाच्या यात्रेला कशाला जायचे, असे सांगत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होणार नसल्याचा सूचक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. योग्य वेळी लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असेही ते या वेळी म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे आज साताऱ्यात आले होते. या वेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. "आगामी निवडणुकीत उदयनराजे मला मदत करतील,' असे शिवेंद्रसिंहराजे म्हणतात याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, ""धाकटे बंधू असल्यामुळे मला त्यांचे काम करावेच लागेल. लहान मुलाने काहीही केले तरी आपण त्याला सोडत नाही. त्यांनी चांगली दाढी वाढविली आहे. मला तर वाटते, की त्यांनी एखाद्या चित्रपटात काम करावे. सुपरहिट होईल.'' 

रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासोबत आपला भाजपप्रवेश होणार, अशी चर्चा आहे, यावर बोलताना ते म्हणाले, ""रामराजे व शिवेंद्रसिंहराजे हे दोन्ही राजे आहेत. माझी त्यांच्याशी तुलना करू नका. रामराजे वयाने व मानानेही मोठे आहेत. त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतली. मला त्यांच्याशी जोडू नका.'' राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जिल्ह्यात येणार आहे, त्याला जाणार का या प्रश्‍नावर "यात्रा तर सर्वांच्याच निघतात. आमची स्वत:ची जत्रा असताना दुसऱ्यांच्या यात्राला कशाला जायचे,' असे म्हणत त्यांनी शिवस्वराज्य यात्रेबाबत सूचक वक्तव्य केले. 

यापूर्वी फक्त अडवाअडवी 
माझ्या मतदारसंघात जी काही विकासकामे झाली, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच झाली आहेत. आधी कोणी काय केलं. अगोदर केवळ अडवाअडवीचीच कामे केली. कामे लांब राहिली. त्यात अडथळे आणण्याव्यतिरिक्त काहीच झाले नाही, असे म्हणत त्यांनी भाजप सरकारची एक प्रकारे भलावण करत यापूर्वीच्या सरकारांवर ताशेरे ओढले. 

पक्ष कोणताही... सामान्यांशी बांधिलकी 
माझे सर्व पक्षांत मित्र आहेत. कोणाला भेटलो, की लगेच निघालो, असे होत नाही. सत्तेसाठी लाईन लावणारा मी नाही. मात्र, ज्या-त्या वेळेस लोकांच्या हिताचा जो निर्णय असेल, लोकांना योग्य वाटेल, तो कोणताही निर्णय असला, तरी मला घ्यावाच लागेल. पक्ष कोणताही असला तरी आजवर मी सामान्यांशी बांधिलकी सोडली नाही. मनाला पटतो तोच निर्णय मी घेतो. काय करायचे ते वेळ आल्यावर ठरवू, असेही उदयनराजे म्हणाले. 

loading image
go to top