esakal | 'टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले', विनायक राऊतांनी राणे पुत्रांना डिवचले
sakal

बोलून बातमी शोधा

'टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले', विनायक राऊतांनी राणे पुत्रांना डिवचले

'टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले', विनायक राऊतांनी राणे पुत्रांना डिवचले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : चिपी विमानतळावरून विमानाचे टेक-ऑफ होण्यापूर्वीच उद्घाटनाच्या मुद्द्यावरून (chip airport inauguration) राजकीय वाद रंगला आहे. उद्घटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हवेच असं काही नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane on chipi airport) यांनी केले होते. त्यानंतर आणखी शिवसेना आणि नारायण राणेमधील वाद पेटताना दिसत आहे. त्यावरच आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: चिपी विमानतळ: उद्घाटनाला नारायण राणेंना बोलवणार? सुभाष देसाई म्हणाले....

गेल्या सात वर्षांपासून चिपी विमानतळ बांधून तयार होतं. मात्र, वाहतुकीला उपलब्ध नव्हतं. येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री राणे यांनी माहिती दिली. त्याबाबतच बोलताना खासदार विनायक राणे म्हणाले, ''आता जे बडेजाव मारतात ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांना बोलावणार की नाही? हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार आहे सांगायचा? असा सवालही त्यांनी नारायण राणेंना केला. राणेंना माहिती नसेल तर त्यांनी कोणाकडून शिकून घ्यावे. इतकंच माहिती नसेल तर अमित शाहंना विचारावे, असेही ते म्हणाले.''

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची माहिती देऊन या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बाप असावा तर असा असं विधान केलं होतं. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. ''टिंगू-मिंगू आहेत ते पण बडेजाव मारायला लागले. बाप असावा तर असा, असं म्हणतात. मात्र, बाप असावा पण आयत्या बिळातला नागोबा असू नये. आयत्या बिळातला नागोबा होऊन तुम्ही श्रेय घेऊ शकत नाही, असे विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, आम्ही चिपी विमानतळाचे यजमान आहोत. एअरपोर्टचे मालक आहोत. हा उद्योग विभागाचा विषय आहे. नारायण राणे यांच्याबाबत माहीत नाही. पण कोणाला बोलवायचं याबाबत अजून प्रस्ताव आलेला नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.

loading image
go to top