esakal | चिपी विमानतळ: उद्घाटनाला नारायण राणेंना बोलवणार? सुभाष देसाई म्हणाले....
sakal

बोलून बातमी शोधा

narayan rane

चिपी विमानतळ: उद्घाटनाला नारायण राणेंना बोलवणार? सुभाष देसाई म्हणाले....

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन (Chipi airport Inauguration) केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. चिपी विमानतळाचे श्रेय घेण्यासाठी राणे आणि शिवसेनेमध्ये लढाई सुरु झाली आहे. "आम्ही चिपी विमानतळाचे यजमान आहोत. एअरपोर्टचे मालक आहोत. हा उद्योग विभागाचा विषय आहे. नारायण राणे यांच्याबाबत माहीत नाही. पण कोणाला बोलवायचं याबाबत अजून प्रस्ताव आलेला नाही" असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) म्हणाले.

उद्योग विभाग आणि MIDC ने हा प्रकल्प हाती घेतला होता, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली. "MIDC ने प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे आज हे विमानतळ पूर्ण होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 9 ऑक्टोबरला उद्घाटन होत आहे" अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

हेही वाचा: भाजप खासदाराच्या घराबाहेर फेकले बॉम्ब; राज्यपालांनी व्यक्त केली चिंता

"286 हेक्टर जमीन संपादित केली आणि विमानतळासाठी प्रस्ताव मागितले. सिंधुदुर्गवासियांना प्रतिक्षित असलेल्या या विमानतळाचं उदघाटन होणार आहे. काल मुख्यमंत्री आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं फोनवर बोलणं झालं" असे सुभाष देसाईंनी सांगितले.

हेही वाचा: देशमुख यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी; नागपुरात हालचाली

"या विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल. पर्यटन व्यवसाय सिंधुदुर्गात आहे. त्याचा फायदा होईल. पर्यटक भेट देऊ शकतील" असे देसाई म्हणाले. "चिपी विमानतळाशी राजकारणाचा संबंध नाही ही सुविधा आहे. काही काळ गेला पण सुविधा महत्त्वाची आहे. धावपट्टी दोनदा करावी लागली" अशी माहिती देसाई यांनी दिली.

loading image
go to top