

MPSC Chairman on Leave Until Paper Leak Inquiry Ends
Esakal
एमपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू होतं. अखेर या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मंत्री शिवेंद्र राजे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. चौकशी समिती स्थापन करण्यात आलीय. त्या समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही शिवेंद्र राजेंनी दिलं. चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.