

Additional Charge of MPSC Chairman to Satish Waghole | Maharashtra News
Sakal
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या प्रशासकीय पातळीवर मोठी आणि महत्त्वाची घडामोड घडली आहे. एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार हे रजेवर गेले असून, त्यांच्या जागी आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत.