Maharashtra Public Service Commission announces Civil Services Preliminary Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ३८५ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी २८ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर १७ एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असं आवाहन आयोगाद्वारे करण्यात आलं आहे.