Maharashtra Government to Receive MPSC Reform Report
esakal
-किरण कवडे
MPSC Exam Pattern : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पद्धत, वेळापत्रक, प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर परीक्षार्थी व पालकांचे प्रश्न व सूचना ऐकून घेण्यासाठी शीघ्र कृती दलाने सार्वजनिक संवाद कार्यक्रम सुरू केला आहे. राज्यातील सहा विभागांमध्ये हा कार्यक्रम होणार असून, विद्यार्थी, पालक व हितधारकांचे सर्व प्रश्न, सूचना ऐकल्यानंतर ही समिती तत्काळ करण्यायोग्य आणि दीर्घकालीन उपाय अशा दोन टप्प्यांतील उपाययोजना सुचविणारा अहवाल राज्य शासनाला सुपूर्द करणार असल्याची माहिती शीघ्र कृती दलाचे सदस्य तथा नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. ‘एमपीएससी’च्या प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद.