esakal | कोणाच्या आदेशावरून घेतला निर्णय? MPSC चा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

एमपीएससीच्या परीक्षा 14 मार्च 2021 रोजी होणार होत्या. मात्र या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं एमपीएससीने जाहीर केलं. यानंतर राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत.

कोणाच्या आदेशावरून घेतला निर्णय? MPSC चा खुलासा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - राज्य सरकारच्या आदेशावरूनच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं एमपीएससीने म्हटलं आहे. निर्णय शासनाच्या लेखी परीपत्रकानंतरच निर्णय घेण्यात आला. आपत्ती निवारण विभागाने निर्णय दिला. त्याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. सरकारने याबाबत पत्र पाठवलं असल्याचा दावा एमपीएससीने केला आहे. राज्य सरकारच्या आदेशावरूनच परीक्षा पुढे ढकलली असल्याचं एमपीएससीने म्हटलं. 

एमपीएससीच्या परीक्षा 14 मार्च 2021 रोजी होणार होत्या. मात्र या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं एमपीएससीने जाहीर केलं. यानंतर राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या या निर्णयावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एमपीएससी मंडळानं, असा निर्णय घेणं चुकीचं आहे. या निर्णयाचा निषेध करतो. महिनोन महिने अभ्यास केलेला असतो. माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे वाचा - MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक; नवी पेठे रास्ता रोको

आमदार रोहित पवार यांनीही परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून म्हटलं की, यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची ची परीक्षाही झाली पाहिजे.

हे वाचा - 'एमपीएससी'वरून, रोहित पवार, सत्यजित तांबेंचा सरकारला घरचा आहेर

एमपीएससीची परीक्षा 14 मार्चला होणार होती ती पुढे ढकलण्यात आल्याचं एमपीएससीने सांगितलं होतं. यानंतर लगेच विद्यार्थी आक्रमक झाले. एमपीएससीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याचे परीपत्रक काढले. आता पूर्व परीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरु असल्यांची माहिती समोर येत आहे. पुढची सूचना येईपर्यंत पुढे ढकलली की काही कालावधीसाठी हा निर्णय घेतला याबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत.

loading image