MPSC: ‘पीएसआय’ची गुणवत्ता यादी जाहीर

गुणवत्ता यादी प्रसिद्ध होताच यशाची खात्री असलेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
PSI training Nashik
PSI training NashikDEV

पुणे : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ पोलिस उपनिरीक्षक पदाची (पीएसआय) सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार ज्या विद्यार्थ्यांना हे पद नको असेल त्यांनी भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑपटींग आउट) निवडता येणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध होताच यशाची खात्री असलेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) तर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी आणि पीएसआय या तीन पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते. काही दिवसांपूर्वी पीएसआय पदाची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्याप्रमाणे मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी आणि मुलाखत असे एकत्रित गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा एकूण ४९६ जागांसाठी आरक्षणानुसार घेण्यात आली होती. त्यामुळे आरक्षणानुसार असलेल्या जागा आणि गुणवत्ता क्रमानुसार आलेले नाव यावरून निवड होण्याची शंभर टक्के यशस्वी झाल्याची खात्री आल्याने विद्यार्थ्यांनी आभ्यासिकांसमोर जल्लोष केला. गुलालाची उधळण करत, ढोस ताशे, फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे भरवत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना हे पद नको असेल , त्यांना ऑपटींग आउट हा पर्याय निवडता येणार आहे. त्यामुळे ती जागा रिक्त होणार असून त्या जागेवर त्याखालील गुणवंत विद्यार्थ्याला नोकरीची संधी मिळणार आहे. हा पर्याय निवडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसांत अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे, असे सागर ठोंबरे या विद्यार्थ्याने सांगितले.

ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे यांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. ऑपटींग आउट हा पर्यायासाठी निवडण्यासाठी ९ मार्च पासून ३ वाजल्यापासून १६ मार्च पर्यत ११.५९ वाजेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या पर्यायाच्या प्रक्रियेनंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

एमपीएससीने ही लावलेली गुणवत्ता यादी अंतिम निवड यादी नसली तरी यादीत २० व्या क्रमांकावर आहे. पद संख्या पाहिली तर शंभर टक्के पद मिळणार आहे. गेल्या दहा वर्षापासून तयारी करीत होतो. शेवटी यश मिळाले. ऑपटींग आऊटचा पर्याय दिल्याने एमपीएससीचे मनापासून आभार.

- धम्मानंद इंगोले, विद्यार्थी

या पदासाठी २०१५ पासून तयारी करीत होतो. कोरोनामुळे भरती प्रक्रिया चांगली लांबली होती. गुणवत्ता यादीत खुल्या गटातून ४० व्या क्रमांकावर आहे. निवड शंभर टक्के होणार आहे. यश मिळाल्याने डोक्यावरील ताण हलका झाला आहे.

- अमित धुमाळ, विद्यार्थी

अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर किंवा पदावर रुजू होईपर्यत पद नको असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पद घेतले नाही, तर ते पद रिक्त राहत होते. ऑपटींग आउटमुळे कोणा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. सर्वपदे भरली जातील. प्रतिक्षा यादीचा प्रश्नच उरत नाही.

- किशोर राजेनिंबाळकर, अध्यक्ष, एमपीएससी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com