esakal | MPSC Exam: राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC exam

MPSC Exam: राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२० मधील पूर्व परीक्षेचा निकाल अखेर सोमवारी जाहीर करण्यात आला. आयोगाने २०० जागांसाठी ३ हजार २१४ उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण केले आहे. मात्र, यंदा नेहमीप्रमाणे पूर्व परीक्षेच्या आधी जागांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: महिला सरपंच मारहाण प्रकरणात ट्विस्ट; CCTV फुटेज आलं समोर

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चारवेळा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयांमुळे उमेदवारांनी पुण्यात ११ मार्च २०२१ रोजी आक्रोश आंदोलन केले होते. त्यानंतर आयोगाने २१ मार्च रोजी पूर्व परीक्षा कोरोनाचे नियम पाळत पार पाडली होती. तिचा निकाल अखेर सोमवारी जाहीर झाला आहे. राज्यात पुणे केंद्रावरील सर्वाधिक एक हजार ७२ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेची प्रतिक्षा आहे.

खुला प्रवर्ग, ओबीसीचा कटऑफ समान :

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० मध्ये खुला प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाचा कटऑफ समान लागला आहे. एकूण ४०० गुणांच्या पुर्व परीक्षेत दोन्ही प्रवर्गांसाठी सर्वसाधारण कटऑफ २०३.५० गुणांचा आहे. विशेष मागासवर्ग प्रवर्गाचा (एसबीसी) कटऑफही २०३.५ गुणांचा आहे. अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचा १९४.२५ तर अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचा कटऑफ १७३.५ गुणांचा आहे.

प्रमुख केंद्रातील उत्तीर्ण उमेदवार :

पुणे : १०७२

नाशिक : २२०

नागपूर : १०७

औरंगाबाद : २४१

मुंबई (मध्य) : ११०

मुंबई (पश्चिम) : ६६

नवी मुंबई : ८३

पुर्वपरीक्षेचा ‘कटऑफ’ (४०० गुणांपैकी)

प्रवर्ग: साधारण : महिला : क्रिडा

ओपन आणि ओबीसी : २०३.५ : १९० : १४३

एससी : १९४.२५ : १७९.५ : ९४.२५

एसटी : १७३.५ : १७०.६२ :--

एनटी (बी) : २०२.१२५ : -- : --

एनटी (सी आणि डी) : २०३.५ : १९० : --

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आकडेवारीत :

पदांची संख्या : १५

एकूण जागा : २००

उमेदवारांचे अर्ज : २ लाख ६० हजार

मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार : ३,२१४

एका जागेसाठी पात्र उमेदवारांची संख्या : १६

loading image
go to top