MPSC Group C Preliminary Exam 2026
esakal
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता. मात्र, विद्यार्थ्यांकडून झालेल्या तीव्र विरोधानंतर आयोगाने हा निर्णय बदलला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन (OMR आधारित) पद्धतीने होणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक आयोगाने प्रसिद्ध केलं आहे.