MPSC News
MPSC News

MPSC : 400 डॉलरसाठी केला हॉल तिकीटाचा डाटा हॅक! सुपारी घेऊन काम करणाऱ्या हॅकरला पुण्यातून अटक

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेले संयुक्त पूर्व परीक्षेचे तब्बल 94195 हॉल तिकीट बेकायदेशीररित्या डाऊनलोड करून सदर हॉल तिकीट टेलिग्राम चॅनलवर बेकायदेशीररीत्या प्रसारीत करणाऱ्या रोहित दत्तात्रय कांबळे (19) या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून अटक केली आहे.

MPSC News
प्रकल्पग्रस्त असल्याचा बनाव रचून पोलिस भरतीसाठी जोडले दुसऱ्याचेच प्रमाणपत्र; उमेदवार...

या प्रकरणातील आरोपी रोहित कांबळे हा डार्कनेट वरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे आढळून आले असून त्यांच्याकडून त्याला एमपीएसीच्या वेबसाईट वरून परीक्षार्थींचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेचे प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल 400 डॉलरची सुपारी मिळाल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट 'ब' आणि गट 'क च्या संयुक्त पूर्व परिक्षेच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) 28 एप्रील रोजी आपल्या वेबसाईटवर टाकले होते. सदरचे हॉल तिकीट हे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बाह्यलिंकद्वारे आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आले होते. मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत अज्ञात हॅकरने आयोगाने वेबसाईटवर टाकलेल्या बाह्यलिंकमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करुन त्यातील माहिती अवैधरित्या प्राप्त करुन त्याद्वारे वेबसाईटवरील तब्बल 94195 परीक्षार्थींचे हॉल तिकीट डाऊनलोड केले होते. त्यानंतर सदर हॅकरने आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला परिक्षार्थ्यांच्या हॉल तिकीटाचा डाटा एमपीएससी 2023 ए या टेलिग्रामच्या चॅनलवर बेकायदेशीरीत्या प्रसारीत केला होता.

MPSC News
नव्या शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षी 10वी-12वी बोर्डाची परीक्षा होणार की नाही?; शिक्षण मंडळानं दिलं स्पष्टीकरण

या प्रकारानंतर एमपीएसीच्या परिक्षार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती.

या तपासात सायबर सेलंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या टीमने या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास करून अज्ञात हॅकरने गुन्हा करताना वापरलेला आय पी ॲड्रेस मिळवुन तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित दत्तात्रय कांबळे याला पुण्यातील चिखली, पाटील नगर येथून बुधवारी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी रोहित कांबळे याच्या घरातून सदर गुन्ह्यात वापरलेले 1 डेस्कटॉप, 1लॅपटॉप, 3 मोबाईल फोन व एक इंटरनेट राउटर जप्त केले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित कांबळे याने त्याच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. आरोपी रोहित कांबळे याने डार्क नेट वरील साथीदारांच्या मदतीने अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त भारंबे यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठवल्याचे हि त्यांनी सांगितले.

MPSC News
नव्या शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षी 10वी-12वी बोर्डाची परीक्षा होणार की नाही?; शिक्षण मंडळानं दिलं स्पष्टीकरण

पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित कांबळे हा बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून त्याने सायबर सेक्युरेटीचे विविध प्रकारचे कोर्सेस केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच तो डार्क नेटवरील काही हॅकर्ससोबत संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले असून डार्कनेट वरील हॅकर्सनी त्याला एमपीएसीच्या वेबसाईट वरून परीक्षार्थींचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेचे प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल 400 डॉलरची सुपारी दिल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यानुसार पोलिसाकडून पुढील तपास करण्यात येत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com