मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; अखेर आयोगाने घेतला मोठा निर्णय | mpsc new exam pattern 2025 maharashtra government job aspirants | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC New Exam Pattern

MPSC New Syllabus: मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; अखेर आयोगाने घेतला मोठा निर्णय

MPSC New Exam Pattern 2025

MPSC News - राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली.

मागील काही दिवसांपासून विद्यार्थी आयोगाविरोधात आंदोलन करत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं आहे. विद्यार्थी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेसच प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली होती.

शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधी यांचं बैठक घेण्याचं ठरलं होतं. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक न घेताच आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला. (Maharashtra Public Service Commission)

एमपीएससीने निर्णय घेतल्यानंतर पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यभरातील विद्यार्थी नवा अभ्यासक्रमातील बदल आता 2023 पासून नाही तर 2025 पासून लागू करा अशी मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी

टॅग्स :Pune NewsSharad Pawarmpsc