

MPSC Exam 2024
esakal
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आरक्षणाच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) किंवा स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी, तसेच संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्वपरीक्षेपासून नव्याने राबवावी, अशी मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.