
MPSC : मुलाखती संपल्यानंतर तासाभरातच एमपीएससीकडून निकाल जाहीर
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Result) दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी मुख्य परीक्षा 2022 या परीक्षेत सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. महत्वाचे म्हणजे मुलाखती संपल्यानंतर अवघ्या एक तासाच्या कालावधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
14 ते 24 मार्च या कालावधित 227 उमेदवारांच्या 73 पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. सात वाजता या मुलाखती संपल्या आणि आयोगाने अवघ्या तासाभरात म्हणजे आठ वाजेपर्यंत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द केली आहे, दरम्यान सदर भरतीप्रकियेकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तसेच या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता बाहेर पडण्यासाठीची वेबलिंक दिनांक 25 मार्च ते 31 मार्च 2022 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे अशी माहिती आयोगाने ट्विट करत दिली आहे.

MPSC Result
Web Title: Mpsc Result 2022 Mpsc Announces Results Within An Hour After The Last Interview
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..