MPSC result : रोहन कुवरचे यशाचे दशक; मागासवर्गीयांमध्ये राज्यात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc result rohan kuvar bagged first rank in backward classes in mpsc main exam

MPSC परीक्षेत रोहन कुवर मागासवर्गीयांमध्ये राज्यात प्रथम

मालेगाव (जि .नाशिक) : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारीपदाच्या परीक्षेत राज्यात मागासवर्गीयांमध्ये प्रथम आलेल्या रोहन कुवर याने यशाचे दशक पूर्ण केले आहे. यापूर्वी रोहनने नऊ विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले होते. तळवाडे (ता. मालेगाव) येथील नायब तहसीलदार रघुनाथ कुवर यांचा चिरंजीव असलेला रोहन शालेय जीवनापासूनच हुशार होता. जिल्हाधिकारी होण्याचा मानस त्याने व्यक्त केला.


रोहन सध्या नाशिक येथील विभागीय कार्यालयात जीएसटी करनिरीक्षक पदावर काम करीत आहे. यापूर्वी त्याने सहाय्यक कर निरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. पत्नी निर्मला कुवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून आहेत. रोहनने यापूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशन, आयबीपीएस, पोस्ट असिस्टंट, दिल्ली पोलिस पीएसआय, पोलिस उपनिरीक्षक, शिक्षणाधिकारी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले होते. रोहनचे मोठे बंधू देवेंद्र कुवर नाशिक येथील विभागीय कार्यालयात जीएसटी कर निरीक्षक आहेत. कुंवर कुटुंब उच्चशिक्षित असून, भाऊ, बहीण विविध शासकीय पदांवर कार्यरत आहेत. या यशाबद्दल शहर व तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: नाशिक पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलासह दोघांचा चिमुरडीवर बलात्कार

हेही वाचा: भुजबळांविरोधातील तक्रार मागे घ्या, आमदार कांदेना छोटा राजन गॅंगचा फोन

loading image
go to top