MPSC : रिक्त पदे भरण्याचं आश्वासन ठरले फोल

विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी; भरती प्रक्रिया, निकाल अन् मुलाखती रखडल्या
MPSC
MPSCsakal media

पुणे : राज्य सरकारच्या (maharashtra state) विविध विभागांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) सदस्यांची नियुक्ती ३१ जुलैपर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी जुलैच्या सुरवातीला दिले होते. परंतु आयोगातील सदस्यांच्या रिक्त पदांवर अद्याप भरती न झाल्याने उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले असून याबाबत स्पर्धा परीक्षेची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (Mpsc Vaccancies Recruitment Ajit Pawar Statement Fail)

आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरीपासून दूर राहावे लागल्याने अखेर कंटाळून स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करत असंतोष व्यक्त केला. त्यानंतर राज्य सरकारने खडबडून जागे होत, आयोगाच्या कामकाजाला गती मिळावी, यासाठी सर्व सदस्यांची नियुक्ती ३१ जुलैपर्यंत करण्यात येईल, असे जाहीर केले. परंतु, याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसून अजूनही आयोगाचा संपूर्ण भार अध्यक्ष आणि एका सदस्याच्याच खांद्यावर आहे. अडीच वर्षांपासून चार सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. परिणामी, आयोगामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेवर त्याचे परिणाम होत असून परीक्षांचे निकाल, मुलाखती रखडत आहेत. याबाबत आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई व सदस्य दयानंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

MPSC
पुण्यातील 4 धरणांमध्ये मिळून 92 टक्के पाणी साठा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगातील पद भरतीची केवळ घोषणा केली, परंतु प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही. आयोगाचे सदस्य भरून मूळ समस्या सुटणार नाही तर आयोगामार्फत रखडलेल्या परीक्षांच्या तारखा, जाहिराती जाहीर होणे गरजेचे आहे. राज्य सरकार आयोगातील रिक्त पदांच्या भरतीबाबत गांभीर्याने विचार करत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढत आहे. यावर तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.

- महेश घरबुडे, विद्यार्थी

अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत आयोगातील सदस्यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले. आयोगाच्या सदस्यांची फाइल राज्यपालांकडे गेली आहे, एवढीच माहिती गेल्या काही दिवसांपासून कानावर पडत आहे. परंतु, त्यावर कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते. अधिवेशनात सरकारने रखडलेल्या नियुक्त्या होतील, प्रलंबित असलेले निकाल जाहीर होतील, असे सांगितले होते. प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

- शुभम तिडके, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com