मोठी बातमी ! "एमपीएससी'च्या मुख्य परीक्षा आता ऑनलाइन 

तात्या लांडगे
Thursday, 30 July 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवेच्या पीएसआय, एसटीआय, गट-क संवर्गातील मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक ते दीडशे परीक्षा केंद्रे आहेत, तर त्या परीक्षा केंद्रांमध्ये एकूण 15 हजार वर्गखोल्या आहेत. एका खोलीत 24 विद्यार्थी बसविले जातात. ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, विविध कारणास्तव खोल्यांची अपुरी उपलब्धता, विद्यार्थी व परीक्षकास येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय सुयोग्य असल्याचे आयोगाचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील निवडक परीक्षा केंद्रे निवडून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येईल, जेणेकरून निकाल वेळेत लावता येणे शक्‍य होणार आहे, असे आयोगातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले. मात्र, तांत्रिक घोळामुळे महापरीक्षा पोर्टलला विरोध करून ते पोर्टल रद्द करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाचा हा निर्णय पचनी पडेल का, हा मोठा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

सोलापूर : राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बाराशे परीक्षा केंद्रे आहेत. सद्यःस्थितीत पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यास येणाऱ्या अडचणींमुळे परीक्षा व निकाल वेळेत लागावेत म्हणून आयोगाने यापुढील मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेस किमान विद्यार्थी असतात, त्यामुळे आयोगाने हे पाऊल उचलले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच ठेवला जाणार असून, या परीक्षेचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. 

हेही वाचा : तो आला, त्यानं पाहिलं अन्‌ तिघांना आपलंसं केलं..! "या' ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवेच्या पीएसआय, एसटीआय, गट-क संवर्गातील मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक ते दीडशे परीक्षा केंद्रे आहेत, तर त्या परीक्षा केंद्रांमध्ये एकूण 15 हजार वर्गखोल्या आहेत. एका खोलीत 24 विद्यार्थी बसविले जातात. ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, विविध कारणास्तव खोल्यांची अपुरी उपलब्धता, विद्यार्थी व परीक्षकास येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय सुयोग्य असल्याचे आयोगाचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील निवडक परीक्षा केंद्रे निवडून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येईल, जेणेकरून निकाल वेळेत लावता येणे शक्‍य होणार आहे, असे आयोगातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले. मात्र, तांत्रिक घोळामुळे महापरीक्षा पोर्टलला विरोध करून ते पोर्टल रद्द करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाचा हा निर्णय पचनी पडेल का, हा मोठा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

हेही वाचा : संघर्षातून मिळवले यश : परिस्थितीवर मात करणाऱ्या सोनालीला डॉक्‍टर बनण्याच्या स्वप्नासाठी हवा मदतीचा हात ! 

असे आहे नियोजन 

  • परीक्षेवेळी महसूल आणि पोलिस प्रशासनाची मदत 
  • परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीचा वॉच 
  • ऑनलाइन परीक्षेमुळे प्रश्‍नपत्रिका तथा उत्तरपत्रिका जमा करण्याचे टेन्शन कमी 
  • ऑनलाइन पद्धतीनेच होणार मूल्यमापन 
  • एकाच मोठ्या परीक्षा केंद्रावर एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांची घेता येईल परीक्षा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSCs main exams are now online