संघर्षातून मिळवले यश ः परिस्थितीवर मात करणाऱ्या सोनालीला डॉक्‍टर बनण्याच्या स्वप्नासाठी हवा मदतीचा हात ! 

sonali.jpg
sonali.jpg
Updated on

सोलापूरः लेकरू माझं लई गुणाचं हाय. दोन वरसाची व्हती तवा बाप मेला. माज्याकडनं बी कवाच तिला सुख मिळालं न्हाई. पर कसलीच कुरबूर नाय ना कट्‌टाळा नाय. साळत सगळ्यात पहिला नंबरच मिळविला लेकीनं. अन्‌ आजबी दहावीत माज्या गुणाच्या लेकीनं श्‍यान्नव टक्के गुण पाडलं. मला लय आनंद झाला बगा. तिनं माज्याबी अन्‌ तिच्याबी कष्टाचं चीज केलं बगा.....ही भावना आहे सोलापूरच्या जुना पुना नाका परिसरातील झोपडपट्टीत राहून दहावीत 96 टक्के गुण मिळवलेल्या सोनालीच्या आईची. 

जुना पुना नाका परिसरातील पावन गणपती मंदीराजवळील झोपडपट्टीत आमचं घर. मी दोन वर्षाची असताना वडील वारले. आईने आम्हा तीन कच्याबच्यासह संसाराचा गाडा ओढला. थोरल्या बहिणीचे आठवीपर्यंतच शिक्षण झालं अन्‌ वयात आली की तिचं लग्न लावलं. लग्नाच्या खर्चामुळे ओढाताण वाढली. त्यामुळे धुणीभांडी करण्यासाठी आईची अधिक धावपळ सुरू झाली. खर्च भागेना म्हणून लहान भावाला मामाकडं वैरागला ठेवलं. ही सगळी तारेवरची कसरत बघितल्यावर ठरवलं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. खुप शिकायचं अन्‌ डॉक्‍टर व्हायचं. त्याच टप्प्यातला पहिला टप्पा आज सर केला. आज दहावीचा निकाल लागला अन मला 96 टक्के गुण मिळाले. दररोज कामावरून आलेल्या थकलेल्या माझ्या आईच्या चेहऱ्याकडे बघितलं की मी रोज जोमानं अभ्यास केला अन हे यश मिळालं. असं सोनाली अशोक पवार "सकाळ' शी बोलताना सांगत होती. 

सोनाली पवार येथील शरदचंद्र पवार प्रशालेत शिकते. पहिलीपासूनच तिने आपल्यातील नैपुण्यामुळे शाळेतील शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षी तिच्या अभ्यासात व कलागुणात प्रगती होत गेली. मैदानी खेळ, कराटे, वक्तृत्व अशा विविध स्पर्धातून तीने आपले नाव कायमच शाळेच्या फलकावर झळकावले. कराटे स्पर्धेसाठी तिने चेन्नई, श्रीलंकेतही आपले नैपुण्य सिध्द केले. आत्मविश्‍वासासह जिद्दीने अभ्यास केल्यामुळे सोनालीने कोणत्याही शिकवणीशिवाय झोपडपट्टीत राहूनही एवढे गुण मिळवल्याचे तीने सांगितले. आता तिला डॉक्‍टर व्हायचेय. परंतू घरच्या सांपत्तिक परिस्थितीचा अडथळाच तिची मुख्य अडचण असल्याचे तिच्याबरोबरील बोलण्यातून दिसत होते. त्यामुळे समाजातील दानशूर व शिक्षणासाठी मदत करणाऱ्या समाजधुरिणांनी तिला आता मदत करण्याची गरज आहे. आज अनेकांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले परंतू तिला डॉक्‍टर करण्यासाठी व सोनालीचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामधे पुढाकार घेत आज शांता सुरवसे यांनी सोनालीला दोन हजार रूपयांचे बक्षीस देऊन सत्कार केला. दानशूर व्यक्तींना सोनालीची आई देवशिला अशोक मोरे (मोबाईल नंबर 8788563701) यांच्या बॅंक अकाउंट वर आर्थिक मदत पाठवावी. त्यांचा अकाउंट नंबर पुढील प्रमाणे युनियन बॅंक- शाखा क्रॉस रोड सोलापूर . सेव्हिंग अकाउंट नंबर - 579402010003241, IFSC No.UBIN 0557943. 
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Flood Relief Stalled in Solapur 13000 Eligible Farmers Still Waiting for 46 Crore Compensation After Heavy Rains
Pune Satara Solapur Get Relief as Bhatghar Dam Becomes Full Water Discharge Starts Into Nira River
Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Marathi News Esakal
www.esakal.com