"राज की बात"

मृणालिनी नानिवडेकर 
सोमवार, 3 डिसेंबर 2018

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्यासह असावी या तयारीत राज ठाकरे आहेत. गेले काही हिने शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परजण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या प्रयत्नात सातत्य आहे हे आता मान्य करण्यास हरकत नसावी. शिवसेना अयोध्येकडे कूच करू लागल्यावर राज ठाकरे काहीतरी करणार याची अटकळ सर्व संधितांनी घेतली असणारच.तर सेनेने उत्तरप्रदेशाचा रस्ता धरला असताना या पक्षातून उपपक्ष म्हणून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांशी संवाद साधला आहे. चर्चेत रहायची तसेच प्रकाशझोत खेचायची राज यांची शक्‍ती आजही अबाधित आहे याची नोंद घ्यायलाच हवी.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्यासह असावी या तयारीत राज ठाकरे आहेत. गेले काही हिने शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परजण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या प्रयत्नात सातत्य आहे हे आता मान्य करण्यास हरकत नसावी. शिवसेना अयोध्येकडे कूच करू लागल्यावर राज ठाकरे काहीतरी करणार याची अटकळ सर्व संधितांनी घेतली असणारच.तर सेनेने उत्तरप्रदेशाचा रस्ता धरला असताना या पक्षातून उपपक्ष म्हणून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांशी संवाद साधला आहे. चर्चेत रहायची तसेच प्रकाशझोत खेचायची राज यांची शक्‍ती आजही अबाधित आहे याची नोंद घ्यायलाच हवी.

महाराष्ट्राच्या चौरंगी राजकारणात कोणतीही ताकद नसलेला किंबहुना एकेकाळची 11 आमदारांची संख्या गमावॅन बसलेला पक्ष आजही माध्यमांवर अगदी प्राईम टाईची जागा मिळवतो ती अन्य कारणांसह राज यांच्या करिष्म्यामुळे. तर रविवारच्या मुहुर्तावर राज यांनी उत्तर भारतीयांबददलची आपली भूमिका पुन्हा एकदा नव्याने मांडली. फरक एवढाच की यावेळी हिंदीत. राज हिंदी चांगले बोलले त्याला बम्बय्या स्पर्श नव्हता. अर्थात हे सगळे पुन्हा नव्याने सांगून त्यांनी काय मिळवले? मुंबई,पुणे .नाशिक परिसरातील मतदार हाच आजही राज यांचे ऐकतो.स्थानिकांना रोजगार मिळत नसताना परप्रांतातून आलेल्यांनी पैसे का कमवावेत हा जगभर चर्चेत असणारा प्रश्‍न. बाहेरून आलेली मंडळी आपला रोजगार हिरावतात हे अमेरिकेत अभियंता म्हणून गेलेली भारतीय मंडळीही ट्रम्प महाशयांच्या लक्षात आणून देत आहेत अन राज ठाकरेही. 

प्रश्‍न उरतो तो आर्थिक रचनेत अशा प्रश्‍नांना आता स्थान आहे काय हा? अमेरिकेत भारतीय फोफावले त्यात त्यांच्या प्रज्ञेचा भाग आहेही पण मूळत: त्यांना मिळणारे पगार हे स्वस्त असल्याने कंपन्यांना या कुशलतेचा लाभ मिळतो म्हणून. मुंबईत येणारे लोंढेही येथील माणसाची गरज निभावतात, ती ही स्वस्तात.आकडे टाकून वीज चोरून भय्या कपडे इस्त्री करून देतो हे गृहित धरू. वीज चोरणे पूर्णत: चूक.पण भैय्या जी सेवा देतो त्याचे काय मराठी माणूस इस्त्री करताना दिसत नाही. 

मराठी माणसाच्या गृहसंकुलातही चौकीदारी करतो तो बाहेरचा कुणीतरी. संजय निरूपम टाईमची जागा मिळवतो ती अन्य कारणांसह राज यांच्या करिष्म्यामुळे. तर रविवारच्या मुहुर्तावर राज यांनी उत्तर भारतीयांबददलची आपली भूमिका पुन्हा एकदा नव्याने मांडली. फरक एवढाच की यावेळी हिंदीत. राज हिंदी चांगले बोलले त्याला बम्बय्या स्पर्श नव्हता. अर्थात हे सगळे पुन्हा नव्याने सांगून त्यांनी काय मिळवले? मुंबई, पुणे, नाशिक परिसरातील मतदार हाच आजही राज यांचे ऐकतो. स्थानिकांना रोजगार मिळत नसताना परप्रांतातून आलेल्यांनी पैसे का कमवावेत हा जगभर चर्चेत असणारा प्रश्‍न. बाहंरून आलेली मंडळी आपला रोजगार हिरावतात हे अमेरिकेत अभियंता म्हणून गेलेली भारतीय मंडळीही ट्रम्प महाशयांच्या लक्षात आणून देत आहेत अन राज ठाकरेही.प्रश्‍न उरतो तो आर्थिक रचनेत अशा प्रश्‍नांना आता स्थान आहे काय हा? अमेरिकेत भारतीय फोफावले त्यात त्यांच्या प्रज्ञेचा भाग आहेही पण मूळत: त्यांना मिळणारे पगार हे स्वस्त असल्याने कंपन्यांना या कुशलतेचा लाभ मिळतो म्हणून. मुंबईत येणारे लोंढेही येथील माणसाची गरज निभावतात, ती ही स्वस्तात. आकडे टाकून विज चोरून भय्या कपडे इस्त्री करून देतो हे गृहित धरू. वीज चोरणे पूर्णत: चूक. पण भैय्याजी सेवा देतो त्याचे काय मराठी माणूस इस्त्री करताना दिसत नाही. मराठी माणसाच्या गृहसंकुलातही चौकीदारी करतो तो बाहेरचा कुणीतरी. संजय निरूपम यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील 60 सेवा परप्रांतीय बाहेर पडले तर ठप्प होतील असे सांगणारे विधान केले होते. आता काँग्रेसलाही सर्वसमावेशक व्हायचे असल्याने या विधानाचे स्मरण निरूपम यांना आवडत नाही. ते हिंदीभाषक असल्याने काँग्रेसजनांचा त्यांच्याबददलचा रोष वाढतो हे त्यामागचे कारण मराठी माणसाने किंवा कुणीही हलक्‍या दर्जाची कामे करू नयतेच. पाश्‍चात्य देशात जेथे औद्योगीकरण उत्तरित्या झाले आहे तेथे अशी सर्व कामे आजकाल यंत्राव्दारे होतात. तर तेही असो.

राज यांची एकूण उत्तर भारतीयांबददलची किंवा परप्रांतीयांबददलची ते ही सेनेच्या पूर्वीच्या भुमिकेशी जुळणारी आहेत. राज यांच्या मुददयात काही प्रमाणगात तथ्य आहे. काल त्यांनी अत्यंत खुबीने त्यांच्या विधानांच्या आशयाला समांतर अशी स्व. इंदिरा गांधी तसेच माजी राष्ट्रपतींची उदाहरणे शोधून काढली. प्रत्येक प्रांत विकसित झाला तर स्थलांतर होणार नाही, झोपडया सुजणार नाहीत ही सर्व मते ग्राह्य आहेतच मात्र विदयमान चौकटीत ते बसणारे नाही.कामाच्या रोजगाराच्या शोधात आलेला झोपडीनिवारी पूर्वी कॉंग्रेसला मते देई.गरिबी हटावच्या इंदिरा गांधी यांच्या घोषणेचे गारूड त्याला कॉंग्रेस समर्थक करे. मोदी लाटेत हा मतदार अच्छे दिनच्या आशेने भाजपकडे वळला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मुंबईत दाखल झालेला हा परप्रांतीय अत्यंत खुबीने भाजपकडे महापालिका निवडणुकीत काय राखला. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिंकण्याच्या निषेने या मतदाराची अनधिकृत झोपडी अधिकृत करण्याचे निर्णयही घेवून टाकले आहेत. या मतदारामुळेच भाजप पुढेही लक्षणीय कागिरी करू शकेल. त्यामुळेच राज ठाकरे जेंव्हा परप्रांतीयांबददल आक्षेप घेत आहेत तेंव्हा ते शिवसेनेच्याच तपेढीकडे नजर लावून आहेत. उदधव ठाकरे यांना नाकारून हे निम्न मध्यमवर्गीय मतदार मनसेकडे खरेच वळतील? की राज यांच्यासारख्या चतुराला हे आकलन आहे पण तरीही सेनेची मते कधीतरी आपल्याकडे येतील या आशेने टाकलेली ही पाउले आहेत ? सततच्या मराठी माणसाच्या हक्‍काची भाषा बोलण्यामुळेच राज यांना कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस समवेत घेवू शकत नाही.या पक्षांच्या आशीर्वादाने राज शिवसेनेची मतपेढी फोडायचा प्रयत्न करत रहातील. पाच राज्यांचे निकाल भाजपला अनुकूल नसलेच तर प्रादेशिक पक्षांच्या अस्मितांना प्रचंड धुमारे फुटतील.भाषावाद चेतवण्याचे का पुन्हा सुरू होईल. अशा प्रादेशिक नेत्यांमध्येही राज यांना आज फार महत्वाचे स्थान मिळण्याची शक्‍यता नाही कारण त्यांच्याकडे जनाधार नाही.मराठी मतदारांच्या हक्‍काची भाषा त्यांच्यासाठी प्रचलित राजकारणात हक्‍काची जागा पुन्हा एकवार निर्माण करून देईल काय ते बघायचे.पण सध्या तरी सेनेच्या मतात आपला वाटा शोधण्याचे प्रयत्न हेच राज यांच्या हिंदीतल्या भाषणाचे फलित दिसते आहे. पुढे काय होते ते बघायचे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrinalini Nanivedkar Write about Raj Thackrey