संदीप देशपांडे, संतोष धुरींच्या अडचणीत वाढ; सुनावणी लांबणीवर

मनसेच्या आंदोलनादिवशी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला.
political News
political Newsesakal

मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी राज्यासह देशातील धार्मिक वातावरण गढूळ झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू या राज ठाकरेंच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून टीकाही झाली. मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेनं (MNS) केलेल्या आंदोलनादरम्यान महिला पोलिसला धक्काबुक्की झाली. याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना चकवा देऊन पळ काढणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली असून पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे.

political News
भाजपच्या महाजनांनी घेतली शिवसेना आमदाराची भेट, घडामोडींना वेग

मनसेच्या आंदोलनादिवशी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. तेव्हापासून मुंबई पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पण या दोन्ही नेत्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला. दरम्यान, संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला भोईवाडा कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

political News
'भाजपने महाराष्ट्रासाठी रचलेली खेळी देशाला महागात पडली'

देशपांडेवर गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं. पण पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. एवढंच नाही तर संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com