

MLA Sanjay Kute Raises MSP Procurement Issue in Assembly
Sakal
संग्रामपूर : शासनाच्या आधारभूत किमत खरेदी केंद्रांवरील कडक अटी, तसेच ग्रेडिंगमधील अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या विषयावर दै. सकाळने सातत्याने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदार डॉ. संजय कुटे यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले असून, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी अधिवेशनात ठाम भूमिका मांडली.