एसटीला आर्थिक गर्तेत लोटू नका, महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन | ST Workers Strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीला आर्थिक गर्तेत लोटू नका, महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

कोरोनाच्या संकटातून लालपरी आता सावरतेय तिला पून्हा आर्थिक गर्तेत लोटू नका असं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे.

एसटीला आर्थिक गर्तेत लोटू नका, महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आणखी चिघळला आहे. यात कर्मचाऱी एसटी सरकारमध्ये विलिनिकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाने आता कर्मचाऱ्यांना एक नम्र आवाहन केलं आहे. कोरोनाच्या संकटातून लालपरी आता सावरतेय तिला पून्हा आर्थिक गर्तेत लोटू नका असं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे.

काय म्हटलंय महामंडळाने

कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठया आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२००० कोटी रुपया पर्यंत पोहचलेला आहे. असे असतांना देखील, सर्व कर्मचा-यांचे गेल्या १८ महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे. अर्थात, त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत ३५४९ कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. यापुँढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.

हेही वाचा: MSRTC Strike : परिवहन महामंडळाचे तब्बल 126 कोटी रुपयांचे नुकसान

कर्मचारी बांधवांनो.... आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (२८ टक्के ) व घरभाडे भत्ता (८, १६, २४ टक्के ) मान्य केल्या आहे. तसेच दिवाळी भेट ही दिली आहे. असे असुन देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे, त्या मागणीबाबत एसटी महामंडळ आणि राज्य शासन मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे प्रामाणिकपणे अनुपालन करित आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने आपले कार्य सुरु केले आहे.

बंधु भगिनींनो.... आपण संप मागे घ्यावा यासाठी मा. मुख्यमंत्री महोदय यांनी सुध्दा विनंती केली आहे. आपल्या संपामुळे महामंडळाला दररोज १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. अर्थात, संपाचा विपरीत आर्थिक परिणाम संस्था आणि संस्थेचे कर्मचारी म्हणुन आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळे गेली कित्येक दिवस सर्व सामान्य प्रवाशी जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या सर्वांचा विचार करुन आपण तातडीने संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजु व्हावे हीच आपणांस विनंती.

loading image
go to top