ST NCMC Card
esakal
मुंबई : एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एक ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बस स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. तसेच कार्डची नोंदणी केल्यावर क्यूआर कोड पावतीवर महिनाभर सवलत मिळणार आहे.